ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, आपण नवीन कार्यकर्ते उभे करू

 

ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, आपण नवीन कार्यकर्ते उभे करू

विशेष आठवण सांगत राजेंद्र फाळके यांच्या पवार साहेबांना शुभेच्छानगर : लोकसभा निवडणूक झाली आणि कित्येक जण पक्ष सोडून जात होते. त्याच काळात अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री व पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी श्री.पिचड पक्ष सोडून गेले. त्या दिवशी मी साहेबांशी फोन वर बराच वेळ बोललो आणि बातमी सांगीतली. त्यावेळी साहेबांच्या बोलण्यात अजिबात सुध्दा डळमळीत पणा नव्हता‌. ते म्हणाले जाऊ द्या ज्यांना जायचं आहे त्यांना. आपण नवीन कार्यकर्ते उभा करु. नव्या ताकतीने लढू. साहेबांचा हाच आत्मविश्वास सर्वांना खूप काही सांगून जातो.


आमचा हा शरदचंद्रजी पवार नावाचा सावळा विठ्ठल सर्वांसाठी धावून येतो. कधी किल्लारी मध्ये तर कधी देशाच्या सीमेवर, तर कधी कछ गुजरात मध्ये, तर कधी सांगली, सातारा, कोल्हापूर मध्ये सगळ्यांचा तारणहार ठरतो. भूकंप असो, दुष्काळ असो, चक्री वादळ असो की पूर असो. हा सावळा विठ्ठल दिवसाच्या पहिल्या किरणाला शेतकऱ्याच्या बांधावर उभा असतो. पाठीवर हात ठेऊन त्यांना धीर देतो, विचारपूस करतो, समस्या जाणून घेतो त्यांचे गाऱ्हाणे मुंबई-दिल्ली दरबारी मांडतो आणि त्यांना जमेल तशी मदत मिळवून देतो.


विधानसभेला मात्र हीच पुण्याई सोबत होती. सगळे सोडून जात होते. मात्र साहेबांवर प्रेम करणारे साहेबाच्या सोबतच होते. शरद पवार साहेब एकटे पडत आहेत हे पाहून पेटून उठणारी लाखो लोक पाहिली. निस्वार्थी भावनेने फक्त साहेबांच्या साठी काम करायचं म्हणत रात्रंदिवस राबत होती. हे सगळे जवळून मी पाहिले आहे. ज्यांनी कधी राजकारणात भाग घेतला नाही अशी लोक मी शरद पवार साहेब या नावावर जीव ओवाळून टाकतात हा इतिहास याची देही याची डोळा अनुभवतो आहे.


अशा दैदिप्यमान व्यक्तिमत्त्वाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

- राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post