भाजपा कामगार आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी नरेश शेळके

 भाजपा कामगार आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी नरेश शेळके     नगर - नवनागापूरचे माजी उपसरपंच नरेश मोहन शेळके यांची भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडी सेलच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाप्रमुखपदी  निवड करण्यात आलीभाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आलेयाप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर,  जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंगबाळासाहेब महाडिकजिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळेसरचिटणीस गणेश भालसिंगप्रविण ढेपे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणालेगेल्या अनेक वर्षांपासून नरेश शेळके  पक्षासाठी संघटनात्मक काम करीत असूनसंघटन बांधण्याचे कार्य त्यांनी केले आहेसमाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहेकामगार आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदाच्या माध्यमातून भाजपाचा विस्तार करुन पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावेत्याचबरोबर कामगारांच्या प्रश्नांसाठी ठोस भुमिका घेऊन केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या कामगारांसाठी योजनांचा फायदा त्यांना मिळवून द्यावाअसे आवाहन केले.

     याप्रसंगी नरेश शेळके म्हणालेभारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पक्षाचे आपण प्रामाणिकपणे काम करत आहोतआपल्या कामाची दखल घेऊन पक्षाने कामगार आघाडी जिल्हा प्रमुखपदाची मोठी जबाबदारी दिली आहेही जबाबदारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सार्थ ठरवूभाजपा प्रणित केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेतया निर्णयांचा लाभ कामगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करुअसे सांगून सर्वांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post