शिवसेना, राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न


शिवसेना, राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न

कॉंग्रेस नेत्याची थेट सोनिया गांधींकडे तक्रार मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून काँग्रेसकडे दुर्लक्ष केलं जात असून शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत सुरू आहे, अशी तक्रार मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू राय यांनी थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून सात मुद्द्यांवर हायकमांडचं लक्ष वेधलं आहे. त्यात शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसचं होत असलेल्या खच्चीकरणावरही भर दिला आहे. राय यांच्या या पत्रामुळे आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post