स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीला अनुकुल वातावरण, गुप्तचर विभागाचा अहवाल!

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीला अनुकुल वातावरण, गुप्तचर विभागाचा अहवाल!मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत एकत्र लढून दमदार कामगिरी करणार्‍या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनुकुल वातावरण असल्याचा महत्त्वपूर्ण अहवाल ठाकरे सरकारकडे आला आहे. राज्याच्या गुप्तचर विभाग यंत्रणेने हा अहवाल दिल्याची माहिती आहे. टिव्ही 9 वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 विधानपरिषद् निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी विजयी पताका लावण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेप्रमाणेच आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सरकारचा विश्वास दुणावला आहे. पाच महापालिका आणि तब्बल 96 नगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात लागण्याची चिन्हं आहेत. यात नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांचाही समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post