लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्त्वपूर्ण आवाहन

 लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्त्वपूर्ण आवाहन
परळी: यंदा गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम होणार नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी, सर्वांनी स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलं.  तसेच कोरोना महामारीच्या संकटात सामाजिक उपयोगिता आणि आवश्यकता लक्षात घेऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करावेत आणि 12 डिसेंबर हा जन्मदिवस साजरा करावा, असं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले.

यंदा  सर्व सामान्य जनता कोरोनाच्या संकटात सापडली आहे, अशा परिस्थितीत कोणालाही त्रास न होता वेगळ्या पद्धतीने 12 डिसेंबर हा दिवस साजरा करायचा आहे. मोठे नेते, मोठी सभा, गर्दी टाळायची आहे. मी स्वतः 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांनी गडावर दर्शन घ्यायचे आहे. महामारीच्या या संकटात सामाजिक उपयोगिता आणि आवश्यकता लक्षात घेऊन सर्वांनी 12 ते 15 डिसेंबर दरम्यान ठिकठिकाणी केवळ आणि केवळ रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, असल्याने मुंडे साहेबांच्या जन्मदिवशी असे समर्पित कार्यक्रम घ्यावेत व त्याचे फोटो आणि कार्यक्रमाचे वर्णन सोशल मिडियावर द्यावेत, असं आवाहनही पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post