मोबाईल शॉपी फोडणारा सराईत गुन्हेगार जेरबंद
नगर : मोबाईल शॉपी, तसेच घरफोड्या करणारा सिन्नर (नाशिक)येथील सराईत गुन्हेगार योगेश काळू निरगुडे (वय २०) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. २९ नोव्हेंबर रोजी निरगुडे व त्याचे साथीदार मयूर अशोक कातोरे,सोमनाथ कातोरे, अमोल भाऊराव भगत (सर्व रा. शिवडे ता.सिन्नर) यांनी अकोले तालुक्यातील देवठाण येथील संजय शिवनाथ शेळके यांची मोबाईल शॉपी फोडून २२ हजार ५९० रुपयांचे मोबाईल चोरून नेले होते.या गुन्ह्यातील इतर आरोपी फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉस्टेबल बबन मखरे, पोलीस नाईक शंकर चौधरी,दीपक शिंदे, लक्ष्मण खोकले, सचिन अडबल, ज्ञानेश्वर शिंदे, रविकिरण सोनटक्के, रवींद्र घुगासे, सागर सुलाने, बबन बेरड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment