‘मनसे’समोर अमेझॉन नरमली, मराठी भाषेचा अंतर्भाव करणार

‘मनसे’समोर अमेझॉन नरमली, मराठी भाषेचा अंतर्भाव करणार

 


मुंबई : 'मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन नाही', असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं  अ‍ॅमेझॉन विरोधात आक्रमक आंदोलन पुकारले होते. अखेर मनसेच्या 'खळळ-खट्याक' आंदोलनापुढे अ‍ॅमेझॉनला नांगी टाकावी लागली आहे. अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली आहे.

अखेर ॲमेझॉन मनसेच्या आंदोलनापुढे नांगी टाकली. लवकरच मराठीमध्ये येत असल्याचा ॲमेझॉन आपल्या साइटवर नमूद केले आहे. शुक्रवारी ॲमेझॉनच्या पुणे आणि मुंबईतल्या गोडाऊनवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी  हल्लाबोल केला होता.  मनसे कार्यकर्त्यांनी खळ्ळ खट्याक स्टाईलने तोडफोड केली होती. त्यानंतर वसईमध्येही अ‍ॅमेझॉन च्या गोडाऊनची तोडफोड करण्यात आली होती. पुढील सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post