मायक्रो फायनान्स कडुन कर्ज घेणार्या बचत गटांना मोठा दिलासा...अग्रणी बँकेचे महत्त्वपूर्ण आदेश

 *महिला बचत गटांकडून सक्तीची वसुली नको*

*अग्रणी बँकेचे मायक्रो फायनान्स कंपन्याना आदेश*अहमदनगर: कोरोना सारख्या साथरोगामध्ये अनेकांचे व्यवसाय बंद पडले किंवा अडचणीत आले. यात महिला बचत गट व हातावर व्यवसाय करणारे सुध्दा सामील आहेत. त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या संस्था (मायक्रो फायनान्स ) सारख्याकडून सक्तीची वसूली किंवा दमदाटी सारख्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याची शहानिशा करण्यासाठी अग्रणी बँकेकडून जिल्ह्यातील सर्व 15 मायक्रो फायनान्स कंपन्याच्या पदाधिकारी व कर्मचारी यांची आज बैठक घेण्यात आली.

यावेळी त्यांना महिला बचत गट आणि हातावर व्यवसाय असणारे यांच्याकडून सक्तीने वसुली करण्यात येऊ नये, असे अग्रणी बँक अधिकारी संदीप वालावलकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.  यासाठी अग्रणी बँक अहमदनगर कडून 1800-102-1080 हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या कोणी कर्जदारावर अशा प्रकारचा अन्याय किंवा दमदाटी होत असेल त्यांनी या क्रमांकावर त्यांची तक्रार नोंदवावी. कोणत्याही अफवा अथवा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.***

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post