भुजबळ, वडेट्टीवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी

भुजबळ, वडेट्टीवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, मराठा आंदोलकांची थेट राज्यपालांकडे मागणी 



मुंबई: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक आणि मंत्र्यांकडून सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीचा वाद आता राज्यपालांच्या दरबारात पोहोचला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची तक्रार केली आहे. हे दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा समन्वयकांनी राज्यपालांकडे केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या 15 समन्वयकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या आंदोलकांनी राज्यपालांकडे आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मागण्यांचे निवेदन दिलं आहे. तसेच भुजबळ आणि वडेट्टीवार यांचीही तक्रार केली आहे. हे दोन्ही नेते सातत्याने चुकीची विधाने करून दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत. हे दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. तसं निवेदनही त्यांनी दिलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post