दौलतजादा...मंत्र्यांच्या निवासस्थानावर 90 कोटींची उधळपट्टी

दौलतजादा...मंत्र्यांच्या निवासस्थानावर 90 कोटींची उधळपट्टी राज्यात कोरोनाचं संकट निर्माण झाल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक विकास कामांना कात्री लावलेली असतानाच दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधीची उधळण करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या मंत्र्यांच्या बंगल्यांवर गेल्या वर्षभरात 90 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं उघड झालं आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगल्यावर 3 कोटी 26 लाख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर 1 कोटी 78 लाख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सातपुडा बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 33 लाख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयल स्टोन बंगलावर दोन कोटी 26 लाख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत बंगल्यावर 1 कोटी 46 लाख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर 3 कोटी 89 लाख, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या शिवनेरी बंगल्यावर 1 कोटी 44 लाख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर 1 कोटी 67 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post