राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाउन वाढवला

राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाउन वाढवला मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाउनसंदर्भातील प्रतिबंध 31 जानेवारी 2021पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नवे वर्ष साजरे करण्यासाठी कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहनही सरकारने केले आहे.यासंदर्भात, राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने परिपत्रक जारी करत, लोकांनी आपल्या घरात राहूनच साध्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करावे, तसेच समुद्र किनारी, उद्याने आणि रस्त्यावर जाणे टाळावे, असे म्हटले आहे.या परिपत्रकात, विशेषत्वाने दहा वर्षांच्या आतील मुले आणि 60 वर्षांवरील वृद्धांना, महामारीच्या पार्श्वभूमीवर नवे वर्ष साजरे करण्यासाठी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post