बिबट्याचे हल्ले चालूच, ग्रामस्थ जेरीस

 बिबट्याचे हल्ले चालूच, ग्रामस्थ जेरीसनगर : नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात बिबट्याचा उपद्रव कायम असून अनेक गावं जेरीस आले आहेत. तालुक्यातील मिडसांगवी येथे वीजपंप सुरू करण्यासाठी शेतात गेलेल्या 16 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला. तानिया दिलावर शेख असं या मुलीचं नाव असून बिबट्याच्या तोंडात तिच्या अंगावरील मफलर आली. दरम्यान मुलीचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक धावल्याने बिबट्याने पळ काढला. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मुलीच्या हाताला जखमा झाल्या असून तिला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, टाकळीमानूर जवळील तांबेवाडी येथही सकाळी गणेश सुदाम महानवर या मुलावर बिबट्याने हल्ला केला. मात्र गणेशने प्रसंगावधान दाखवत शेजारील विहिरीत उडी घेतली. त्याचा आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक धावून आल्याने बिबट्याने धूम ठोकली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post