आ.निलेश लंके यांच्या 'या' आवाहनाला मिळतोय मोठा प्रतिसाद

 

आ.निलेश लंके यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद
नगर : आमदार म्हणून कार्यक्रमात माझा सत्कार करण्याऐवजी गरजू विद्यार्थी, वयोवृध्द, गरीब रुग्णांना मथशदतीचा हात दर्या, या आमदार निलेश लंके यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक कार्यक्रमात लोकं वह्या तसेच शालेय साहित्य आ.लंकेकडे सुपुर्द करीत आहेत. या प्रतिसादाबद्दल आ.लंके यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 

सोशल मीडियावर लिहीलेल्या पोस्टरवर आ.लंके यांनी म्हटले आहे की,

मी मतदार संघात कोठेही सत्कार स्वीकारणार नाही असे जाहीर  आवाहन केले! त्यानुसार मी जिथे जाईल तिथे सामाजिक भावनेतून माझी माय बाप जनता अश्या सामाजिक पद्धतीने माझा सन्मान करते त्याबद्दल प्रथमतः मनपूर्वक धन्यवाद!

अनेक गरीब विद्यार्थी शिकण्याची इच्छा असूनही पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाही.

अशा परिस्थिमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सत्कार स्विकारण्यास माझे मन धजावत नाही!

त्यामुळे यापुढे कोणीही माझा हार-तूलुरे,पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करू नये!

सत्कार करायचाच असेल तर गरजू विद्यार्थी यांना मदत करा!

सत्कार करायचाच असेल तर वृद्धांना काठी वाटप करा!

सत्कार करायचाच असेल तर गरिबांना हॉस्पिटलसाठी आर्थिक मदत करा!

सत्कार करायचाच असेल तर अंध अपंगांना मदत करा

हाच माझा सत्कार मी समजेल!

माझ्या या आहावानाला प्रतिसाद देत आज नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने नविमुंबई येथे वास्तव्यासाठी असलेल्या व मूळ माझ्या पारनेर-नगर मतदार संघातील माता भगिनी यांना नवीमुंबई सारख्या ठिकाणी काही समस्या अडीअडचणी आहेत का?

ह्या जाणून घेण्यासाठी मी नविमुंबई घणसोली या ठिकाणी गेलो असता!

माझ्या सर्व माता भगिनी यांनी सत्काराला फाटा देऊन माझा सन्मान म्हणून माझ्याकडे गोरगरीब  विद्यार्थ्यांसाठी ५००/- वह्या सुपूर्द केल्या!

तसेच नगर येथील हॉटेल व्यवसायिक श्री.लोकेश शेट्टी यांनी सुद्धा आज माझ्या पारनेर येथील संपर्क कार्यालयात ५८८/- वह्या सुपूर्द केल्या!

त्याबद्दल प्रथमतः सर्वाना मनपूर्वक धन्यवाद!

तसेच उद्याच्या भविष्य काळात सुद्धा आपल्या हातून सदैव गोरगरीब व दिनदुबळ्याची सेवा घडो हीच  मनोकामना!

पुन्हा एकदा आपले सर्वांचे माझ्या वतीने तसेच पारनेर-नगर मतदार संघातील जनतेच्या वतीने जाहीर आभार!


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post