ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, आमदार निधीतून 25 लाख मिळवा

 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, आमदार निधीतून 25 लाख मिळवा

पारनेरचे आ.निलेश लंके यांचे आवाहनपारनेर:- राज्यातील मुदत संपणार्‌या आणि लांबणीवर पडलेल्या 14  हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्‌यांना दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर  विधानसभा मतदार संघातील 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून पंचवीस लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंके यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post