हौसेने लग्नाला आले आणि साडेचार लाखांचा ऐवज गमावला....

हौसेने लग्नाला आले आणि साडेचार लाखांचा ऐवज गमावला....जामखेड -  - लग्न समारंभात नवरदेवाच्या परण्याची मिरवणूक पहात आसताना हातातील कापडी पिशवी नजर चुकवून  ब्लेडने कापून त्यातील साडेचार लाखांचे नऊ तोळे सोने अज्ञात चोरट्याने लंपास केले. त्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना हे लग्न मात्र खूपच महागात पडले. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गेल्या 24 डिसेंबर रोजी लग्नाची खूप मोठी तारीख होती. याच दरम्यान शहरातील कर्जत जामखेड रस्त्यावरील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात एक लग्न समारंभ झाला. मात्र लग्नापूर्वी पुणे येथून आलेले पाहुणे निलेश उद्धवराव देशमुख हे मंगल कार्यालयातील पटांगणात नवरदेवाच्या परण्याची मिरवणूक बाजूला उभे राहून पाहत थांबले होते. याच दरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने देशमुख यांच्या हातातील कापडी पिशवी ब्लेडने कापून पिशवीतील साडेचार लाख रुपयांचे नऊ तोळे सोने लंपास केले. देशमुख यांना उशिरा ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांना पोलीस ठाण्याला धाव घेतली. त्यानंतर निलेश देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. बापूसाहेब गव्हाणे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post