केव्हीके दहिगाव-ने च्या वतीने किसान दिनाचे आयोजन

 केव्हीके दहिगाव-ने च्या वतीने किसान दिनाचे आयोजनश्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने, कृषि समर्पण अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि, नेवासा व झुआरी अॅग्रो केमिकल लि, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने किसान दिनाचे आयोजन नेवासा येथे करण्यात आले. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस ’२३ डिसेंबर’ हा दिवस ‘राष्ट्रीय किसान दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.

विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे. संपूर्ण जगासाठी आता हि एक शेतीमध्ये चळवळ सुरु झाली आहे. भविष्यातील दिशा ओळखून शेतकऱ्यांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे सचिव श्री.काकासाहेब शिंदे यांनी केले.

रबी हंगामातील पिक व्यवस्थापनाबद्दल केव्हीके चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. कौशिक एस.एस. यांनी याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कांदा पिक उत्पादन व कांदा बीज उत्पादन या विषयावर केव्हीके चे शास्त्रज्ञ श्री. नंदकिशोर दहातोंडे यांनी मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांचे कल्याण होणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच शेतकऱ्यांची अडचणीच्या वेळी त्यांची सोय होणे महत्त्वाचे आहे असे कृषि समर्पण अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी यावेळी केले.

खत उत्पादनामध्ये अग्रणी असलेले झुआरी अॅग्रो केमिकल कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक अनुजसिंग तसेच कंपनीचे विपणन व्यवस्थापक श्री. प्रणव खामकर व अशोक शेवाळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना किसान दिनाच्या शुभेच्छा देऊन शेतकऱ्यांना पुढील येणाऱ्या कार्यक्रमामध्ये शक्य ते साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नेवासा पंचायत समितीचे सभापती श्री.रावसाहेब कांगुणे, नेवासा तालुका कृषि अधिकारी श्री. दत्तात्रय डमाळे उपस्थित राहून शेतकऱ्यांचे ऋण व्यक्त केले व त्यांना किसान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला कृषि समर्पण अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि, नेवासा चे सर्व संचालक, सदस्य तसेच श्री. सुदामराव बनसोडे, मोहनराव मारकळी, सुभाष जाधव, अनिल घोलप, जानकीराम डौले, विठ्ठल देशमुख उपस्थित होते. तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी केव्हीके चे शास्त्रज्ञ इंजि. राहुल पाटील, श्री. दत्तात्रय वंजारी व इतर सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन बडधे व तर आभार श्री. माणिक लाखे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post