राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यपदी आ.किशोर दराडे
आ.दराडे यांच्या निवडीने विद्यापीठाच्या उपक्रमांना चालना मिळेल
- प्रा.प्रशांत म्हस्के
नगर- आमदार किशोर दराडे यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या या उल्लेनिय कामाची दाखल घेऊनच त्यांची ही निवड केली आहे. ते आपल्या कार्य कर्तुत्वाने विद्यापीठाच्या विविध उपक्रमात योगदान देऊन विद्यापीठाच्या लौकिकात आणखी भर पाडतील. राहुरी कृषी विद्यापीठाने राज्यासह देशात आपल्या कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या संशोधनाने मोठे नाव कमवलेले आहे. विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थीही देशपातळीवर नाव चमकवित आहेत. आ.किशोर दराडे यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या उपक्रमांना आणखी चालना मिळून कृषी क्षेत्रात विद्यापीठचे नाव चमकवतील, यात शंका नाही, असे प्रतिपादन शिक्षक प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत म्हस्के यांनी केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या कार्यकारी परिषद सदस्यपदी शिक्षक आमदार किशोर दराडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शिक्षक प्रशिक्षण परिषदेच्यावतीने अध्यक्ष प्रा.प्रशांत म्हस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब पिल्ले, बाळासाहेब तांबे, बाळासाहेब काळोखे, रविंद्र हरिश्चंद्रे, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रा.अंबादास शिंदे आदि उपस्थित होते.
सत्कारानंतर आ.किशोर दराडे म्हणाले, राहुरी कृषी विद्यापीठाने आपल्या गुणवत्तेत वाढ करुन देशात नावलौकिक मिळविला असू, त्यात भर घालण्यासाठी आपण योगदान देऊ. विद्यापीठ आणि शासन यांच्यात समन्वयाची भुमिका ठेवून विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जास्तीत-जास्त सोयी उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न राहील. आज केलेल्या सत्कारामुळे आपणास प्रेरणा मिळणार असल्याचे आ.दराडे यांनी सांगितले.
यावेळी आ.किशोर दराडे व शिक्षक प्रशिक्षण परिषदेच्या पदाधिकार्यांसमवेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
Post a Comment