केडगाव शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

 केडगाव शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंदनगर : कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत केडगाव शिवारात कांदा मार्केट ते निल हॉटेल दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे. पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे व पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोख पथकातील सपोनि विवेक पवार व कर्मचार्‍यांनी दि.14 रोजी मध्यरात्री सापळा रचून आरोपी पकडले. एका मोटार सायकलवर तिघे तर दुसर्‍या मोटारसायकलवर दोघे आरोपी होते. पोलिसांनी एका दुचाकीवरील तिघांना पकडले तर दुसर्‍या दुचाकीवरील आरोपी पलायन करण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या तिघांकडून एक एअर पिस्टल, विना क्रमांकाची दुचाकी, स्टीलचा धारदार चाकू, मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी नितीन किसन पवार सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात कोतवाली, नगर तालुका पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. पोना योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, विष्णू भागवत, रवी टकले, भारत इंगळे, सुजय हिवाळे, सुमित गवळी, तानाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, योगेश कवाष्ट, कैलास शिरसाठ, सुशिल वाघेला आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post