केडगावच्या बोल्हाईमाता मंदिराच्या जिर्णोध्दाराला प्रारंभ

  बोल्हाईमाता मंदिराच्या जिर्णोध्दाराला प्रारंभ

केडगावच्या रचनात्मक विकासासाठी कटिबध्द -आ. संग्राम जगताप
केडगाव : केडगावच्या  विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही . केडगावचा रचनात्मक विकास करण्यासाठी कटिबध्द असुन त्यासाठी नियोजनबध्द विकासकामे हाती घेण्यात येत असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली .

केडगाव येथील नविन गावठाण परिसरात असणाऱ्या बोल्हाईमाता मंदिराच्या जिर्णोध्दर कामाचे भुमिपुजन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते . यावेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर , नगरसेवक राहुल कांबळे , माजी सरपंच रामदास येवले , केडगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष अंजाबापु सातपुते , रावसाहेब सातपुते , अनिल ठुबे , शशिकांत आठरे, जयद्रथ खाकाळ आदि उपस्थीत होते .

यावेळी जगताप म्हणाले की ,केडगाव येथे असणाऱ्या बोल्हाई माता मंदिराच्या विकास कामाला भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे . याठिकाणी होणाऱ्या सांस्कृतीक सभागृहाचा उपयोग गोरगरिबांच्या कार्यक्रमासाठी व धार्मिक कार्यासाठी होणार असल्याने हे मंदिर केडगावच्या विकासाचा मानबिंदू ठरणार आहे .

यावेळी बाबासाहेब कोतकर , जालिंदर कोतकर , बच्चन कोतकर , अनिल आंधळे , रामदास महाराज क्षिरसागर , रमेश परतानी , राजेंद्र पवार , आसाराम जगदाळे आदि उपस्थीत होते . माजी सरपंच प्रभाकर गुंड यांनी उपस्थीतांचे स्वागत केले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post