माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची 'या' प्रकरणात निर्दोष मुक्तता

 

फसवणूक व धमकी प्रकरणात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची निर्दोष मुक्ततानगर :  जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक व पिस्तुलाने धाक दाखविल्याप्रकरणी नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दाखल केलेल्या प्रकरणात  माजी मंत्री  शिवाजी कर्डिले, आणि प्रकाश कर्डिले व अनिल कर्डिले  यांची सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दोषारोप ठेवण्यात आले होते.  

नगरमधील नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी भिंगारजवळ 23 एकर जमीन खरेदी करण्यासाठी सुमारे 92 लाख रुपये शिवाजी व प्रकाश कर्डिले यांना दिले होते. मात्र शिवाजी व प्रकाश कर्डिले यांनी ही जमीन दुसऱ्यांनाच विकल्याचे निर्दशनास आले असल्याचे डॉ. कांकरिया यांचा दावा होता. या संदर्भात शिवाजी कर्डिले यांच्या घरी जाऊन डॉ. कांकरिया यांनी विचारणा केली असता शिवाजी कर्डिले यांनी पिस्तूल दाखवून धमकावले. या वेळी प्रकाश कर्डिले हेही तेथे उपस्थित होते. प्रकाश कर्डिले यांचा मुलगा अनिल कर्डिले हे पुरावे नष्ट करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले, असा आरोप कांकरिया यांनी ठेवला होता

या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सर्व  पुरावे व साक्षीदार तपासून न्यायालयाने तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 

.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post