जुन्या पेन्शनबाबत शिक्षकांसाठी खूषखबर... ‘ती’ अधिसूचना रद्द होणार

जुन्या पेन्शनबाबत शिक्षकांसाठी खूषखबर... ‘ती’ अधिसूचना रद्द होणारमुंबई - राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यात अडथळा असणारी 10 जुलै 2020 ची अधिसूचना रद्द करण्याचा अखेर संमत झाला आहे. मुंबईत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियमावली 1981  मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना 10 जुलै 2020 रोजी जारी केली होती. या अधिसूचनेनुसार राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त हजारो मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार संकटात येणार होता. मात्र शिक्षक संघटनांनी याला विरोध दर्शवला होता. आ.कपिल पाटील, आ. सुधीर तांबे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. जयंत आसगावकर, आ. अभिजित वंजारी, प्रधान सचिव वंदना कृष्णा आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ना.वर्षा गायकवाड यांनी सदर अधिसूचना रद्द करण्यास मान्यता दिली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post