जीवन ज्योत फाऊंडेशन च्या पाठपुरावा रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू.

 जीवन ज्योत फाऊंडेशन च्या पाठपुरावेत यश रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू...!

नेवासा :नेवासा फाटा ते शेवगांव रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात वेळोवेळी पाठपुरावा करून केलेल्या आंदोलनामुळे मार्गी लागला असून या रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या कामास प्रारंभ झाला असल्याची माहिती जीवन ज्योत फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली . याबाबत बोलताना नवले म्हणाले की, मागील वर्षी श्रीरामपूर ते नेवासा ते शेवगाव रोडच्या दुरुस्तीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागात आंदोलन करून निविदा काढण्यास भाग पाडले होते याच निवेदनाच्या अंतर्गत सलग दोन वर्ष दुरुस्ती आणि देखभाल संबंधित कॉन्ट्रॅक्टदारावर टाकण्यात आलेली आहे पण वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा सतत पाठ पुरावा करून यावर्षी देखील चालू पावसाळ्यात खड्ड्यात मुरूम टाकायला लावला आणि पावसाळा संपताच अत्यंत वेगाने डाबराने खड्डे बुजवण्याचे काम जीवन ज्योत फाऊंडेशन चे पदाधिकारी स्वतः कामावर लक्ष देऊन करून घेत असल्याचे कमलेश नवले यांनी सांगितले. रस्त्याचे खड्डे बुजवत असताना मागील बुजवलेले खड्डे पुन्हा पडले असतील तर पुन्हा तपासून बुजवण्याचे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे या रस्त्याने ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघात होण्याची शक्याता वाढल्याने जीवन ज्योत फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्याने श्रीरामपूर ते नेवासा ते शेवगाव रस्त्यावर विशेष लक्ष देऊन काम पूर्ण करून घेत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post