रेखा जरे खून प्रकरण, पोलिस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन
नगर : नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा शोध अद्याप लागलेला नसून पोलिसांनी आता बोठे बाबत माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनाच आवाहन केलं आहे. याबाबत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, आरोपी बोठे याच्या घरी व ऑफिसमध्ये झाडाझडती घेतली आहे. याठिकाणी आण्धखी काही पुरावे मिळाले आहेत. आरोपी बोठे बद्दल माहिती मिळवण्यास पोलीस प्रयत्नशील आहेत. आम्ही विश्वास बाळगतो की लवकरात लवकर त्याला अटक करू. मात्र नागरिकांना देखील आमचे आवाहन आहे की याबाबत कुठलीही माहिती कोणाकडे असेल, तर निश्चित पोलिसांना द्या. या संदर्भातील माहिती सांगणार्यांची पूर्ण गोपनीयता राखली जाईल.
नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट येथे दि.30 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ बोठे पसार आहे.
Post a Comment