रेखा जरे हत्या प्रकरण...बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी निकाल
नगर : यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामिनावर आता बुधवार दि.16 डिसेंबर रोजी न्यायालय निकाल देणार आहे. आज झालेल्या सुनावणीत सरकार पक्ष तसेच आरोपींच्यावतीने युक्तीवाद करण्यात आला. बाळ बोठे याच्यावतीने ऍड. महेश तवले यांनी युक्तीवाद करताना बाळ बोठे यांनी प्रसिध्द केलेल्या हनीट्रॅप वृत्तमालिकेचा उल्लेख केला. वृत्तमालिकेत सागर भिंगारदिवे याचा नामोल्लेख होता. भिंगारदिवे हाच हे हनीट्रॅप चालवत असल्याचे बोठे यांनी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे त्या रागातून सागर भिंगारदिवे याने बोठे यांचे नाव घेतले असल्याचा दावा ऍड. महेश तवले यांनी केला. हा युक्तीवाद सरकारी वकील सतीश पाटील यांनी खोडून काढत दोघांमध्ये वाद असता तर या दोघांमध्ये अनेकदा फोन कॉल कसे झाले? दोघांचे कॉल डिटेल्स आणि हत्याकांडाचा घटनाक्रम जुळतो कसा असा प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवादाची नोंद घेत अटकपूर्व जामीन अर्जावर 16 डिसेंबरला निकाल देण्याचे जाहीर केले.
Post a Comment