स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद

स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद नगर- स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले  आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. जितेंद्र भारत/दुधकल्या भोसले (वय 31, रा. घोसपुरी, ता. नगर व रा. पढेगांव, ता. कोपरगाव), राहुल टवकर्‍या भोसले (वय 27, रा. पिंपळगांव पिसा, ता. श्रीगोंदा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. दि. 26 डिसेंबर रोजी फिर्यादी अजिंक्य चंद्रकांत गोगावले (वय 26, रा. हवेली, जि. पुणे) व त्यांचे मित्र यांना अहमदनगर जिल्ह्यात स्वस्तात जमीन देतो, असे फोनवरुन वेळोवेळी सांगून चिखली येथे बोलावून घेतले. ते आल्यानंतर 6 ते 7 आरोपींनी दगडफेक व मारहाण करुन त्यांच्या जवळील रोख रक्कम व सोन्याची चैन असा 1 लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस बेलवंडी पोलीस स्टेशनला गु.र.नं. 604/2020 भादविक 420, 315 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील आरोपींचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र भोसले हा घोसपुरी परिसरात येणार असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ. दत्ता हिंगडे, बबन मखरे, पोना. सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, पोकॉ. प्रकाश वाघ, रोहिदास नवगिरे, जालिंदर माने, प्रशांत राठोड व पोहेकॉ. बबन बेरड यांनी घोसपुरी शिवारात सापळा लावला. यात जितेंद्र भारत/दुधकल्या भोसले आणि राहुल टवकर्‍या भोसले अलगद सापडले. 

त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचे साथीदार करण भारत/दुधकल्या भोसले (रा. पढेगाव, ता. कोपरगाव), अनिल टवकर्‍या भोसले (रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा), देवेंद्र भारत/दुधकल्या भोसले (रा. पढेगाव, ता. कोपरगाव) यांनी मिळून केला असल्याची कबुली दिली. इतर आरोपींचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना  बेलवंडी पोलिस ठाण्यात हजर केले आहे.  ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केल

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post