सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

 

सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूरनगर : केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात नामंजूर झाला आहे. त्यामुळे कोतकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोतकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयानं दि.15 डिसेंबर रोजी निकाल दिला. यात सरकार पक्षातर्फे ऍड.केदार केसकर यांनी बाजू मांडली. केडगाव येथे सात एप्रिल 2018 रोजी शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या झाली होती. या गुन्ह्यात सुवर्णा कोतकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. मागील महिन्यात कोतकर यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. या विरोधात तपासी अधिकारी यांनी न्यायालयात अर्ज केला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post