भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर

भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर मेलबर्न:  गोलंदाजांनी केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान ऑस्ट्रेलियाने ६ बाद १३६ धावा केल्या होत्या आणि फक्त २ धावांची आघाडी घेतली होती. त्याआधी भारताने पहिल्या डावात ३२६ धावाकरत १३१ धावांची आघाडी घेतली होती. सामन्यातील दोन दिवस अजून शिल्लक आहे. आता उद्या ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजी किती लढात देतात त्यावर भारताच्या विजय लांबेल.

कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्ठात आला. भारताने पहिल्या डावात १३१ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार रहाणेने ११२ तर रविंद्र जडेजाने ५७ धावा केल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post