पालकमंत्र्यांनी हत्ती पकडण्याचे कौशल्य बिबटे पकडण्यासाठी दाखवावे... video


पालकमंत्र्यांनी हत्ती पकडण्याचे कौशल्य बिबटे पकडण्यासाठी दाखवावे

माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांची मागणीनगर (सचिन कलमदाणे): नगर जिल्ह्यात बिबट्यांचा उपद्रव चिंताजनक बनला असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना त्याकडं लक्ष देण्यास वेळ नाही. मुश्रीफ हे कोल्हापूरचे असून त्यांच्या भागात हत्तींचा धुमाकूळ जास्त आहे. हत्तींचा प्रश्र्न सोडवण्याचा अनुभव असलेल्या मुश्रीफ यांनी बिबट्याच्या प्रश्र्नात लक्ष घालावे अशी मागणी भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे. ते नगरमध्ये भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. मुश्रीफ यांनी हत्ती पळवून लावण्याचे कोशल्य नगर जिल्ह्यातील बिबटे पकडण्यासाठी दाखवावे असे आवाहन शिंदे यांनी केल.


Video by-यतीन कांबळे0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post