फुले दांम्पत्य सन्मान दिवस गावा-गावात साजरा करावा: सचिन गुलदगड

 १ जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिवस गावा-गावात साजरा करावा: सचिन गुलदगड         नगर- कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षातील सर्व महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतिथी व विविध ऊत्सव कार्यक्रम विविध ठिकाणच्या आयोजकांनी रद्द केले. याच श्रुंखलेत पुणे येथे दरवर्षी १ जानेवारीला  आयोजीत होणारी “१ जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिवस महारॅली” यंदाच्या वर्षी आयोजकांना स्थगीत करावी लागली व प्रातिनिधीक  स्वरूपात  स्थानिक कार्यकर्त्यांनी भिडेवाडा व फुलेवाडा येथे जाऊन वंदन करावे तसेच महाराष्ट्रातील ईतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्थानीक ठीकाणि कोविड १९ च्या नियमाधिन राहुन हा ऊत्सव साजरा करावा. असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले आहे.

१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा जोतीराव फुले व माता सावित्रीआई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे येथे सुरू केली होती. या दिवसाचे व कार्यांचे औचित्य साधुन ही महारॅली दरवर्षी आयोजित करण्यात येत होती. यंदाच्या वर्षी ही महारॅली स्थगीत करण्यात आली आहे. म्हणुन गावागावात स्थानिक ठिकाणी हा ऊत्सव दिवस साजरा करावा असे आवाहन . स्थानिक पातळी वर हा ऊत्सव कसा साजरा करावा खालीलप्रमाणे...

१) १ जानेवारी फुलेदांम्पत्य सन्मान दिन ते ३ जानेवारी माता सावित्री फुले जन्मदिन ( महिला शिक्षक दिन) त्रीदिवसीय सप्ताहाचे आयोजन करावे.

२) या सप्ताहा मधे कोविड १९ च्या नियमाच्या अधिन राहुन रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच ईतर ऊपक्रम राबवावे.

३) आपल्या घरासमोर रांगोळी काढावी व शक्य असल्यास घरावर रोषणाई करावी.

४) मुख्य चौकात डिजीटल लाऊन फुले दाम्पत्य सन्मान दिनाच्या शुभेच्छा द्याव्या.

५) मुख्य चौकात मिठाई वाटप करावे.

अशा प्रकारे विविध ऊपक्रमा मार्फत हा ऊत्सव साजरा करावा असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post