ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्दीस मुदतवाढ

 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्दीस मुदतवाढनगर : राज्यभरातील 14235 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुका पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणार आहेत. या निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने प्रसिध्द केलेल्या मतदार याद्यांवर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य निवडणुक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिध्दीला मुदतवाढ जाहीर केली आहे. आधीच्या नियोजनानुसार हरकतींवर निर्णय होवून 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द होणार होत्या. मात्र आता या अंतिम याद्या 14 डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येतील, असे राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post