लोहसरला अनिल गितेंचीच गरज ग्रामस्थांचा निर्धार

 लोहसरला अनिल गितेंचीच गरज ग्रामस्थांचा निर्धार
राज्यात 14 हजार ग्रामपंचायतिच्या निवडणूक प्रक्रिया चालू झाली असून  गावोगाव गाठी भेटी आणि बैठकांचा  जोर वाढत चालला  आहे. पाथर्डी तालुक्यातील महत्वाची आणि जिल्हाभर आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोहसर गावची निवडणूक होत आहे विद्यमान सरपंच  अनिल गिते पाटील यांनी लोहसर ग्रामस्थांची निवडणूक संदर्भात चर्चा आणि विचार विनिमय करण्यासाठी प्रमुख ग्रामस्थांची बैठक बोलावली होती यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या  लोहसर गावात झालेली  विकास कामे उल्लेखनिय आहेत एक बदनाम गावाला मिळालेले नावलौकिक टिकवण्यासाठी सर्वांनी अनिल गिते पाटील यांच्या  नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास मंडळ स्थापन करून निवडणूक लढवावी विरोधाला विरोध करणाराला त्यांची लायकी गत 2 निवडणुकीत लोहसरच्या जनतेने दाखवली असून   विकासाच्या मुद्द्यावर आणि स्तिर गावकारभारासाठी अनिल गिते पाटील यांची गरज असल्याची भावना  आपल्या मनोगतात व्यक्त केली अनिल गिते यांनी  लोहसरची जनता गेली 50 वर्ष आमच्या कुटुंबावर विस्वास टाकत आहे त्या विस्वासाला कधीच तडा जाउ देणार नाही लोहसरचा नावलौकिक देशभर घेऊन जाण्यास अहोरात्र परिश्रम करणार असून ग्रामविकासात लोहसर हे अग्रेसर राहील यासाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन केले यावेळी तुकाराम सानप, काशिनाथ खेडकर, गोरक्ष गिते, मोहन दगडखैर, महादेव गिते, आजिनाथ रोमन, यांची भाषणे झाली राजेंद्र दगडखैर यांनी आभार मानले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post