सॅमसंगचा गॅलॅक्सी सिरीजमधील ‘हा’ स्मार्ट फोन आता कमी किंमतीत

सॅमसंगचा गॅलॅक्सी सिरीजमधील ‘हा’ स्मार्ट फोन आता कमी किंमतीत

 


सॅमसंगने Galaxy सिरिजमधील टॉपच्या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. कंपनीने Galaxy A31 फोनवर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी असून 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह फोर रिअर कॅमेरा सेटअप दिलेला आहे. सॅमसंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Galaxy A31 तुम्ही 17 हजार 999 रुपयांना खरेदी करू शकता. हा फोन आधी 18 हजार 999 रुपयांना मिळत होता, मात्र कंपनीने या फोनच्या किंमतीत 1 हजार रुपयांची विशेष सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन किंमतीसह हा फोन सॅमसंग रिटेल स्टोर्स किंवा विविध वेबसाईट व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून तुम्ही खरेदी करू शकता.


– 6.4 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले

– MediaTek MT6768 ऑक्टाकोर प्रोसेसर
– 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज (मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवू शकता)
– फोर रिअर कॅमेरा सेटअप
– 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची लेन्स, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा
– सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post