रोजगार गेल्याने सुरू केला बनावट नोटा बनवण्याचा उद्योग, तिघांना अटक

 रोजगार गेल्याने सुरू केला बनावट नोटा बनवण्याचा उद्योग, तिघांना अटक



ठाणे: लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने कर्जबाजारी झालेल्या तिघांनी मिळून चक्क भारतीय चलनातील हुबेहूब दिसणाऱ्या 2 हजाराच्या बनावट नोटा बनवल्या. त्या विकायच्या तयारीत असताना त्यांना वागळे गुन्हे शाखा पथकाने अटक केली. त्यांच्याकडे तब्बल 85 लाख 45 हजारांच्या बनावट नोटा, संगणक, प्रिंटर, पेपर्स रिम, शाई, कतार, स्केल, मोबाईल असा मुद्देमाल सापडला आहे. त्यांना न्यायालयात हजार केले असता 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती आज पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

आरोपींमध्ये चिपळूण येथील सचिन गंगाराम आगरे (वय 29) आणि मन्सूर हुसेन खान (वय 45) तसेच अंधेरीत राहणाऱ्या चंद्रकांत महादेव माने (वय 45) यांचा समावेश आहे. यातील आरोपी सचिन याला संगणकाचे चांगले ज्ञान आहे. तो दुबईला नोकरीसाठी जाणार होता. मात्र, त्याला एजंटने दगा दिला. त्यामुळे तो मन्सूर खान याच्या झेरॉक्सच्या दुकानात काम करीत होता. आरोपी मन्सूर खान हा झेरॉक्सचे दुकान चालवीत होता. तर आरोपी चंद्रकांत महादेव माने याचे कोल्हापूरला सोन्या-चांदीचे दुकान होते. ते लॉकडाऊनमध्ये बंद झाले. 40 लाखांचे कर्ज झाले. म्हणून या तिघांनी लॉकडाऊनमध्ये झालेल्या कर्जाची परत फेड करण्यासाठी युक्त्या वापरून 2 हजारांच्या बनावट नोटा, छपाई प्रिंटर, स्कॅनर आणि सॉफ्टवेअरचा वापर करून छापल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post