नवीन वर्षात इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस महागणार

नवीन वर्षात इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंसेस महागणार नवी दिल्ली - नवीन वर्षात गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. विशेषतः टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन यांसारख्या उपकरणांच्या किंमती सुमारे १० टक्क्यांनी वाढतील, असा अंदाज विविध कंपन्यांनी व्यक्त केला आहे. तांबे, अॅल्युमिनिअम व पोलाद यांच्या किंमतींत वाढ होत असल्यामुळे तसेच सागरी आणि हवाई वाहतुकीच्या शुल्कामध्ये वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर टीव्ही पॅनलचा पुरवठा उत्पादकांकडून पुरेशा प्रमाणावर होत नसल्यामुळे या पॅनलच्या अर्थात ओपनसेलच्या किंमतींत दुपटीने वाढ झाली आहे. कच्च्या खनिज तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून प्लास्टिकच्या किंमतींत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. यामुळे नाईलाजाने एलजी, पॅनासोनिक व थॉमसन या कंपन्यांनी टीव्हीच्या किंमती वाढवण्याचे ठरवले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post