शिर्डीकडे निघालेल्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी सुप्यातच रोखल...व्हिडिओ
नगर : साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोडबाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर आता या फलकावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. तृप्ती देसाई गुरुवारी शिर्डीला बोर्ड हटविण्यासाठी जात असताना त्यांना अहमदनगरच्या सुपे टोलनाक्यावर अडवण्यात आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिर्डीपासून 100 किलोमीटर आधीच तृप्ती देसाई आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना कार्यकर्त्यांसह सुपा पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. यावेळी पोलिस आणि देसाई यांच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये बरीच वादावादी झाली. देसाई यांनी आपल्याला असं रोखणं चुकीच असल्याच सांगत शिर्डीत जाण्यावर आपण ठाम असल्याच माध्यमांशी बोलताना सांगितलं. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संस्थानने त्वरित बोर्ड हटविण्याची मागणी केली असून तो नाही हटवला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशार्यानंतर गुरुवारी सकाळपासून शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिर परिसरात लावलेल्या फलकांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शिवसेना, तसेच ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनीही देसाई शिर्डीत आल्या तर त्यांना रोखण्याचा इशारा दिल्याने शिर्डीत पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
व्हिडिओ - विक्रम बनकर
Post a Comment