ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले करोनाबाधीत
मुंबई: ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आढळला आहे. वॉट्सअपच्या स्टेटस द्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. लक्षणे दिसत असल्याने मी कोव्हिड टेस्ट करून घेतली होती, ती पॉजिटीव्ह आढळली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी या द्वारे केले आहे.
मागील दोन दिवसांत डिसले यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन पुरस्काराबद्दल सन्मान स्विकारला होता.
Post a Comment