मालगाडीचे डबे घसरले...दौंड-मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प

मालगाडीचे डबे घसरले...दौंड-मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्पश्रीगोंदा - दौंड - मनमाड रेल्वेमार्गावरील श्रीगोंदा ते बेलवंडी स्थानका दरम्यान आज पहाटे दोनच्या सुमारास दौंड वरून मनमाड च्या दिशेने सिमेंट घेऊन जाणाऱ्या मालवाहतूक रेल्वेगाडीचे बारा डबे रुळावरून खाली घसरल्याने या मार्गावरून दक्षिण भारतातून उत्तर भारतात मनमाड मार्गे जाणाऱ्या बहुतांशी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आले आहेत तर 02779,01039,01040,02150,00103 या रेल्वेगाड्या पुणे, लोणावळा, कल्याण ,इगतपुरी मार्गे मनमाड च्या दिशेने वळविण्यात आल्या आहेत.     पहाटे बेलवंडी स्थानकाजवळ  हा अपघात घडल्यामुळे या मार्गावरील सर्व एक्सप्रेस गाड्या मागील स्थानकावरच थांबवण्यात आल्या श्रीगोंदा बेलवंडी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सिमेंट वाहतूक करणाऱ्या या रेल्वेगाडी ला एकूण 42 धब्बे होते त्यापैकी 12 डबे घसरले असल्याने हा रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याने या मार्गावरील प्रवास करणाऱ्या आजच्या नियोजित धावणाऱ्या प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे हा अपघात नक्की कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post