विलंबाने दाखल होणा-या गुन्ह्यात घट - पोलीस अधीक्षक मनोज पाटील

 विलंबाने दाखल होणा-या गुन्ह्यात घट - पोलीस अधीक्षक मनोज पाटीलअहमदनगर (विक्रम बनकर):- अहमदनगरला गुन्हे दाखल होताना त्याला विलंब होता कामा नये, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार नगर जिल्ह्यामध्ये त्याचा परिणाम दिसून आला आहे. मागील महिन्याच्या तुलनेमध्ये ही संख्या आता कमी झाले आहे. जे काही गुन्हे प्रलंबित राहिले आहे. त्याची चौकशी होईल, चौकशीमध्ये जर कोणी दोषी आढळल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, अशी माहिती नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी  दिली.

अधीक्षक पाटील म्हणाले, 'जिल्ह्यामध्ये घटना घडल्यानंतर गुन्हे दाखल करण्यास आणि ठिकाणी विलंब होतो. याची माहिती घेतली होती, मागील महिन्यामध्ये सर्व पोलिस ठाण्यांना सूचना देऊन नागरिकांचे गुन्हे तात्काळ कसे दाखल होतील याची खबरदारी घ्या, असे सांगितले होते. मागील महिन्यामध्ये विलंब झालेल्या गुन्ह्यांची संख्या ही  ऑक्टोबर मध्ये 245 होतो. हीच संख्या नोव्हेंबरमध्ये 133 इतकी झाली आहे. याचा अर्थ म्हणजेच की 112ने कमी झाली आहे. मेडिकल करण्याची जबाबदारी ही संबंधित ठाणे अंमलदार तसेच पोलिसांची आहे. यात नागरिकांचा कुठेही सहभाग नाही. पोलिसांनी त्यांची जबाबदारीही पार पाडावी. अनेक प्रकरणांमध्ये त्यामध्ये उशीर होतो ही बाब सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे तशा प्रकारचे निर्णय सुद्धा दिलेले आहे. तसेच दुचाकीचोरी व अन्य घटना आहे त्या दाखल होण्यास विलंब लागतो ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आता त्याला कोणत्या प्रकारचा विलंब लागता कामा नये, अशा प्रकारचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post