फेसबुकवर मैत्री करून 70 लाखांचा गंडा, नायजेरियन आरोपीला दिल्लीतून अटक

 फेसबुकवर मैत्री करून 70 लाखांचा गंडा, नायजेरियन आरोपीला दिल्लीतून अटक

नगरच्या सायबर पोलिसांची कामगिरीनगर : उच्च शिक्षित इसमाला परदेशी महिला असल्याचे भासवून फेसबुकव्दारे मैत्री करून 70 लाखांचा गंडा घालण्यात आल्याची तक्रार नगरच्या सायबर क्राईम पोलिसांत दाखल झाली होती. सदर फसवणूक करणार्‍याने स्वत: परदेशी महिला असल्याचे भासवले तसेच साथीदारामार्फत आयुर्वेदीक कच्चा माल खरेदी करण्याचा बहाण करून खोटी कागदपत्रे पुरवून 70 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल झाली होती. याप्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या टिमने तांत्रिक तपास केला. सांशित आरोपी दिल्ली परिसरातील असल्याचे निष्पन्न झाल्यावर पथकाने सलग सात दिवस दिल्लीत ठाण मांडून इदूह केस्टर उर्फ इब्राहीम (वय 33, रा.दक्षिण दिल्ली) यास ताब्यात घेतलं. त्याच्या चौकशीतून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयाने 24 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपी नायजेरियन नागरिक असून फेसबुकवर मैत्री करून गंडा घालणार्‍या टोळीचा तो सदस्य आहे. या कामगिरीत पोसई प्रतिक कोळी, पोहेकॉ योगेश गोसावी, उमेश खेडकर, मल्लिकार्जून बनकर, दिगंबर कारखेले, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरूण सांगळे, पूजा भांगरे, प्रशांत राठोड, गणेश पाटील, वासुदेव शेलार यांनी सहभाग घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post