बाजारात येण्याआधीच सिरमची लस अडचणीत, 'कोविशिल्ड' नावावरून वाद

 

बाजारात येण्याआधीच सिरमची लस अडचणीत, 'कोविशिल्ड नावावरून वाद



नांदेड: सिरम इन्स्टिट्यूट तयार करीत असलेल्या कोरोनावरील लसीला ‘कोविशिल्ड’ नाव वापरण्यास  आक्षेप आहे, अशा आशयाचा दावा नांदेडच्या क्युटीस बायोटेक या कंपनीने नांदेडच्या जिल्हा न्यायालयात सादर केला आहे. जिल्हा न्यायालयाने सिरम इन्स्टिट्यूटला नोटीस बजावण्याचे आदेशही दिले आहेत. पुढील सुनावणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे.


पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील संशोधित लस अंतीम टप्प्यात आहे. या लसीचे नाव कोविशिल्ड असे ठेवण्यात येणार आहे. परंतु, क्युटीस बायोटेक कंपनीच्या म्हणण्यानुसार कोविशिल्ड या नावाचा वापर करण्यासाठी ट्रेडमार्क कंपनीकडे 6 जून 2020 रोजीच अर्ज केलेला आहे. ट्रेडमार्क कायद्यानुसार ज्यांनी अर्ज अगोदर दाखल केला त्यालाच या नावाचा ट्रेडमार्क देण्यात येतो. तसेच क्युटीस बायोटेकची कोविशिल्ड या नावाने वेगवेगळी उत्पादने बाजारात आहेत. ट्रेडमार्क संचालकांनीही सिरम इन्स्टिट्यूटला पाठविलेल्या अहवालात या गोष्टीचा उल्लेख केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post