साधा माणूस... मुख्यमंत्री राजेशाही खुर्ची नाकारतात तेव्हा... Video

 ....आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाकारली राजेशाही खुर्चीऔरंगाबाद: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा साधेपणाही नेहमी चर्चेचा विषय असतो.  औरंगाबादमध्ये  पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा साधेपणा  पाहण्यास मिळाला आहे.

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन पार पडले. उद्धव ठाकरे जेव्हा व्यासपीठावर पोहोचले होते तेव्हा त्यांच्यासाठी राजेशाही खुर्ची ठेवण्यात आली होती. इतर मान्यवरांसाठी ही साधी खुर्ची ठेवलेली होती.


मुख्यमंत्री राजेशाही खुर्चीजवळ पोहोचले असता समोरील प्रकार पाहून त्यांनी तातडीने राजेशाही खुर्ची बाजूला हटवण्याची सूचना दिली. सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने व्यासपीठावरून राजेशाही खुर्ची हटवली आणि त्या जागी साधी खुर्ची ठेवली. त्यानंतरच मुख्यमंत्री ठाकरे हे साध्या खुर्चीवर बसले. मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा पाहून शिवसेनेचे नेते, मंत्री आणि पालिकेचे कर्मचारी भारावून गेले होते.


Edited by-सचिन कलमदाणे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post