पाहुणे म्हणून लग्नाला आले आणि सात लाखांचा ऐवज गमावला...

पाहुणे म्हणून लग्नाला आले आणि सात लाखांचा ऐवज गमावला...नगर -  तालुक्यातील एका लग्न समारंभातून पर्स लांबविल्याची घटना घडली आहे. पर्समध्ये सात लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल होता. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संबंधीची फिर्याद सचिन गुंदेचा (वय 46, रा. बार्शी, जि. सोलापूर) यांनी दिली आहे. सचिन गुंदेचा हे बुधवारी (दि. 9) नगर तालुक्यातील चास शिवारात हेमराज लॉन्स येथे लग्न समारंभासाठी आले होते. लग्नातून अज्ञात इसमाने गुंदेचा यांच्याकडे असलेली पर्स लांबवली. पर्समध्ये रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने तसेच हिर्‍याचे दागिने असा सात लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल होता. आपल्याकडे असलेल्या पर्सची चोरी झाल्याचे गुंदेचा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुंदेचा यांच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री 10 वाजता नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post