सीबीएसई बोर्डाचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी

सीबीएसई बोर्डाचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी
नवी दिल्ली: विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षांवर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी आज देशातील विद्यार्थ्यांना संबोधित केलं. केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली होती.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी यावेळी बोलताना ते म्हणाले की, सीबीएसईने कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. बोर्डाने गुणपत्रिकेवरून 'नापास' हा शब्दही हटवला आहे. ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं. तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, भारताच्या नव्या शिक्षण पद्धतीची जगभरातून कौतुक केलं जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post