इंग्लंडमध्ये करोना विषाणूचा आणखी एक नवीन अवतार, भारतासह जगभरात चिंता

इंग्लंडमध्ये करोना विषाणूचा आणखी एक नवीन अवतार, भारतासह जगभरात चिंता इंग्लंड : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सापडल्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच कोरोनाचा दुसरा स्ट्रेनही समोर आला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन जुन्या रुपांपेक्षा अधिक घातक असल्याचं बोललं जातं. जुन्या अवतारांच्या तुलनेत हा वेगाने पसरत असल्याचं निरीक्षण आहे. कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या दोन केसेस सापडल्याची माहिती ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी दिली आहे. हा नवा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतून आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. 

दक्षिण आफ्रिकेहून परत आलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःला आयसोलेट करावे, असं आवाहन ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून सापडलेला अवतार यूकेत सापडलेल्या अवतारापेक्षा अधिक खतरनाक असल्याचं मानलं जातं. कारण त्याच्या संसर्गाचा वेग अधिक जास्त आहे. कोरोनाचा पहिला नवा अवतार दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये सापडला होता. मात्र आता तो संपूर्ण देशात पसरला आहे. अशातच आणखी एक नवा स्ट्रेन सापडल्यामुळे घबराट पसरली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post