भाजप व रासप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत‌ जाहीर प्रवेश

 

भाजप व रासप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत‌ जाहीर प्रवेशमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड तालुक्यातील भाजप व रासपाच्या कार्यकर्त्यांनी  यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ,कामगार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, खा. सुप्रिया सुळे, गृहमंत्री ना. अनिल देशमुख,आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे,अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे,सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे उपस्थित होते. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर व माजी आ. रमेश थोरात यांच्या पुढाकाराने तात्यासाहेब ताम्हाणे,पोपटराव बोराटे,चंद्रकांत कारंडे,दादासो भिसे,जनार्दन सोनवणे,प्रकाश टिळेकर,अशोकराव बोराटे,संतोष जाधव,शिवराम ताम्हाणे, आतिष बोराटे,सतिश खुने,बिभिषण खुने,संतोष ढोरले या पदाधिकाऱ्यांनी आज पक्षप्रवेश केला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post