पुढील काही दिवसांत राष्ट्रवादीत इनकमिंग, भाजपमधील अनेक नेते इच्छूक - ना. जयंत पाटील
कोर्टाच्या स्थगितीनंतर विरोधकांनी आकांडतांडव करण्याची गरज नाही
कांजुरमार्ग येथील मेट्रो कारशेडला सध्या न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी त्याची अंतिम सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. कोर्ट ज्यावेळी स्थगिती देते, तेव्हा अंतिम निर्णय येईपर्यंत त्यात काही बदल होऊ नये, अशी कोर्टाची अपेक्षा असते. त्यामुळे आरेतील जंगलाच्या विरोधात जे लोक आहेत, त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटण्याचे काही कारण नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केली. कांजुरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज एमएमआरडीएला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ना. जयंत पाटील यांनी उत्तर दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी भाजपमधील अनेक नेते इच्छूक असल्याचेही ना. जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. पुढील काही दिवसांत राष्ट्रवादीत इनकमिंग झालेले आपल्याला दिसेल, असेही ते म्हणाले.
राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसान होऊन आता दोन महिने झाल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रातून पथक येत आहे. यावर भाष्य करताना ना. जयंत पाटील म्हणाले की, आदरणीय शरद पवार साहेब कृषीमंत्री असताना केंद्रातून तात्काळ पथक येत होते. शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानाचा अंदाज घेत होते. मात्र केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला.
Post a Comment