भाजपला पुन्हा धक्का? ‘या’आमदाराच्या वाढदिवसाच्या पोस्टरवर खडसेंचा फोटो

भाजपला पुन्हा धक्का? ‘या’आमदाराच्या वाढदिवसाच्या पोस्टरवर खडसेंचा फोटोजळगाव :  भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक मानले जातात. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सावकारेही हातात घड्याळ बांधणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच सावकारेंच्या वाढदिवशी झळकलेलं पोस्टर राजकीय वर्तुळात कुजबूज वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे. सावकारेंच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कुठल्याही नेत्याचा फोटो न लावता फक्त एकनाथ खडसे यांचा फोटो लावला. या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post