नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा भारत बंद मध्ये सहभाग

नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा भारत बंद मध्ये सहभाग दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवून व देशव्यापी बंद मध्ये सहभागी होत नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने पारित केलेले तीन अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार शिल्पा पाटील यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके, तालुका अध्यक्ष उद्धवराव दुसुंगे, जिल्हा सरचिटणीस केशवराव बेरड, युवक तालुका अध्यक्ष मनोज भालसिंग, राहुल बहिरट, तालुका उपाध्यक्ष संजय बहिरट  अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पापामिया पटेल, बाळासाहेब रोहोकले, भास्कर मगर आदि उपस्थित होते.

केंद्र सरकारने नवीन बहुमताच्या जोरावर पारित केलेले तीन कृषी कायदे हे देशातील शेतकर्‍यांच्या विरोधात आहे. या कायद्यातील तरतुदींमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. हे अन्यायकारक कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करीत असून, केंद्र सरकारने त्यांची दखल घेण्याऐवजी त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी केलेला प्रकार निषेधार्ह आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाची व संपुर्ण देशात शेतकर्‍यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने पारित केलेले तीन अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post