पार्थ पवार यांची पंढरपूरातुन उमेदवारी, जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

 पार्थ पवार यांची पंढरपूरातुन उमेदवारी, जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रियाकोल्हापूर :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे सुपुत्र पार्थ पवार  यांना पंढरपूरमधून पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याची चर्चा रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. पार्थ यांच्या उमेदवारीबाबत अशी कोणतीही चर्चा नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'पार्थ पवार यांच्याबद्दल अमरजित पाटील यांनीच मागणी केली आहे. पण हा आमच्या पक्षांतर्गत मुद्दा आहे. त्यांच्या मागणीबद्दल पक्षातील ज्येष्ठ नेते बसून निर्णय घेतील', असंही पाटील यांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post