‘चला हवा येऊ द्या’मध्ये रोहित पवार व पंकजा मुंडे यांच्यात गंमतीशीर जुगलबंदी

 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये रोहित पवार व पंकजा मुंडे यांच्यात गंमतीशीर जुगलबंदीमुंबई : झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात पुढच्या भागांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील युवा चेहरे झळकणार आहेत. खा.डॉ.सुजय विखे, त्यांच्या पत्नी धनश्री विखे, राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे व त्यांचे पती अमित पालवे चला हवा येऊ द्या मधील थुकरटवाडीत येणार आहेत. दि.14, 15 डिसेंबर रोजी या भागाचे प्रसारण होणार असून युवा नेत्यांच्या सहभागामुळं या एपिसोडची उत्सुकता वाढली आहे. या एपिसोडचे काही टिझरही प्रसारित झाले आहेत. यात एका खेळादरम्यान आ.रोहित पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणात शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचे दिसतय. 


तुम्ही माझ्या घरातील सगळ्या व्यक्तींना फोडू नका....

या मंचावर उपस्थित जोडप्यांना रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा खेळ खेळण्यास सांगितलं होतं. यामध्ये एक वस्तू घड्याळही होती. आश्चर्याची बाब म्हणजे सुजय विखे यांची पत्नी आणि पंकजा मुंडे यांचे पती या दोघांनीही घड्याळावर रिंग टाकली. यावेळी पंकजा मुंडेनी रोहित पवार यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. त्यांनी असं म्हटलं की, तुम्ही माझ्या घरातील सगळ्या व्यक्तींना फोडू नका. त्यांचा रोख निश्चितच धनंजय मुंडेंवर होता. त्यावर रोहित पवार यांनी देखील चोख उत्तर दिलं आहे. ’घरच्यांना माहित असतं की आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे’, अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंना उत्तर दिलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post